Team Agrowon
आपल्या गॅलरीत किंवा अंगणातील बागेमधील रोप वाढवण्यासाठी आणि त्यांना छान फुल यावीत यासाठी त्यांची मशागत आणि खत घालावे लागते.
त्यासाठी बाजारातून खत आणावे लागले. पण ते खूप महाग असल्याने अनेकांच्या खिशाला ते परवडत नाही.
त्यापेक्षा आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करु शकतो. ते झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्तही ठरते.
कंपोस्ट खत मातीच्या भांड्यात कंपोस्ट चांगले तयार होते. अगदीच नसेल तर प्लास्टीकचा डबा, बादली असेही चालू शकते. मात्र यामध्ये हवा खेळती राहायला हवी.
सर्वात खाली नारळाच्या शेंड्या घालाव्यात. त्यावर मातीचा एक थर द्यावा.
मातीच्या थरावर घरातील ओला कचरा घालावा. यामध्ये भाज्यांची देठे, फळांची साले, शेंगांची टरफले, लसणाच्या साली अशा वस्तू टाका.
साधारणपणे ३ ते ४ महिन्यांत हा कचरा पूर्णपणे कुजल्यानंतर कंपोस्ट खत चांगल्यारितीने तयार होते. घरी तयार केलेले खत आपल्या झाडांना मिळाल्याने झाडांची छान वाढही होण्यास मदत होते.