Team Agrowon
पूर्ण वाढ झालेली १० टक्के पक्व म्हणजेच कच्ची केळी निवडावीत. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत.
स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. काप काळसर पडून नयेत व ते पांढरे शुभ्र होण्यासाठी एक किलो चिप्ससाठी ०.१ टक्के सायट्रिक ॲसिड किंवा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत.
चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस एवढे ठेवावे.
केळीच्या गराच्या लगद्याची पावडर स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायरच्या साहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात.
लहान मुलांचा आहार, बिस्किटे तसेच आइस्क्रीम मध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.
केळी भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे.