Anuradha Vipat
वाढत्या इंधनाच्या किमती पाहता, कारचे मायलेज वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमची कार उत्तम मायलेज देईल याची खात्री करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.
कार खूप वेगाने चालवण्यापेक्षा ४० ते ६० किमी/तास या स्थिर वेगात चालवल्यास इंधन कमी लागते.
योग्य वेळेत गियर बदलणे खूप महत्त्वाचे आहे.ज्यामुळे इंधन कमी जळते
टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनला कार ओढण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे इंधन जास्त जळते.
शहरात ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना एसीचा वापर कमी करा. कारण खिडक्या उघड्या असल्यास हवेचा अडथळा वाढून मायलेज कमी होते.
जर ट्रॅफिक सिग्नल ४५ सेकंदांपेक्षा जास्त वेळ असेल, तर कारचे इंजिन बंद करा.