Animal Care : जनावरांची पाण्याची गरज कशी ओळखायची?

Team Agrowon

दूध तयार करण्यासाठी

दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. दुधात ८० ते ८५ टक्के पाणी असते. घामामार्फत आणि रक्ताभिसरण करून शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

Animal Care | Agrowon

विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी

शरीरातील विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

Animal Care | Agrowon

पाणी किती वेळा पाजावे

जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन किंवा तीन वेळा जनावरांना पाणी पाजतात.

Animal Care | agrowon

पाण्याची गरज

जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही तसेच अनेक वेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते.

Animal Care | Agrowon

गाभण जनावरांची पाण्याची गरज अधिक

गाभण व दुभत्या जनावरांपेक्षा लहान वयातील वासरांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता अधिक असते. परंतु दुधावर जोपासलेल्या वासराच्या आहारात दुधाचा वापर अधिक असल्यामुळे वासरे पाणी कमी पितात.

Animal Care | Agrowon

मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पाहावयास मिळतो.

Animal Care | Agrowon

पिण्यायोग्य पाणीपुरवठा

स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचा थोडा पुरवठा होईल.

Animal Care | Agrowon
Kolambi | Agrowon