Team Agrowon
पानावर सुरवातीस लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात.
रोपांच्या माना मऊ पडतात.
पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात.
फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात.
बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावर आणि लसूण पिकावरही या रोगाचा प्रादुर्भाव होतो.