Wheat Nutrient Deficiency : गव्हातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे तपासा

सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिके ही चांगलीच जोमात आहेत. तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल. तर आधी गव्हातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे तपासा आणि मगच खते देण्याच नियोजन करा.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

अन्नद्रव्याची कमतरता ओळखन गरजेच

गव्हाच चांगल उत्पादन मिळवायच असेल तर पिकातील अन्नद्रव्याची कमतरता ओळखन गरजेच आहे.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

माती परिक्षण गरजेचे

पिकाला खते देताना सहसा माती परिक्षणानूसार दिली जात नाहीत. खतांच नियोजन करण्यापुर्वी पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे ओळखण गरजेची आहेत. कारण अन्नद्रव्य कमतरतेमुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय घट येते.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

नत्र कमतरता

मुख्य अन्नद्रव्यांपैकी नत्र कमतरतेमुळे गव्हाची पाने पिवळी पडतात. पिकाची नीट वाढ होत नाही. याशिवाय नत्र कमतरतेमुळे फुटवे कमी येतात. पीक वेळेअगोदर तयार होत. पीक खुजे राहते आणि ओंब्या ही छोट्या राहतात.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

स्फुरदाची कमतरता

गहू पिकाच्या पानांवर, शिरांवर व खोडावर जांभळे चट्टे पडले असतील , पिकाची वाढ होत नसेल आणि ओंब्याही लहान असतील तर गव्हाला स्फुरद कमी पडतय असं समजावं.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

लोहाची कमतरता

लोहाच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या राहतात. लोह जास्तच कमी असेल तर पूर्ण पान पिवळे होते. जुनी पाने देखील पिवळी पडण्यास सुरुवात होते.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon

बोरॉन कमतरता

गव्हातील बोरॉनच्या कमतरतेमुळे फुलांतील कळीचा रंग फिक्कट हिरवा होऊन कळी मरते. परागीभवनात अडथळा येऊन ओंब्यात दाणे कमी भरतात.

Wheat Nutrient Deficiency | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...