Team Agrowon
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळेच खाद्यामध्ये आकस्मित बदल दिसून येतात. जनावरांना निकृष्ट प्रतीचे खाद्य मिळाल्यामुळे जनावरे रवंथ करायची बंद होतात व अपचनासारखे आकस्मित आजार होतात
चारा कमी खाणे किंवा पूर्णपणे बंद करणे असे प्रकार दिसून येतात. याच गोष्टीचा एकत्रित परिणाम वजनावर, दुग्ध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर होतो.
उन्हाळ्यामध्ये वातावरणामधील उष्णता वाढते, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियेवर ताण येतो. तापमान नियंत्रणासाठी जनावरे खाद्य कमी खातात व पाणी अधिक पितात.
उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघाताची वारंवारता अधिक असते. यामुळे शरीराची कातडी कोरडी पडते. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे थकून जातात, संकरित जनावरांमध्ये नाकातून रक्त वाहते. अशावेळी व्यवस्थापन करताना जनावरांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे.
पिण्याच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रो लाईट्स वाढवावे. याच बरोबर जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे. जनावरांच्या पाठीवर ओला सुती कपडा किंवा स्वच्छ गोणपाट टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्यासाठी हवा येणाऱ्या दिशेला ओला कपडा लावावा.
जनावरांमध्ये १० अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस हे तापमान उत्पादनासाठी योग्य समजले जाते. वातावरणामधील तापमान ज्या वेळेस जास्त होते, त्यावेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान धर्म ग्रंथी किंवा धापण्याच्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करत असतात.
ज्यावेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते त्यावेळी जनावराला आपल्या शरीरावर होणारा विपरीत ताण सहन करावा लागतो. यामुळे जनावरांच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जास्त भार वाढवते आणि याचा परिणाम निसारण प्रक्रियेद्वारे होतो.