Team Agrowon
सुरुवातीला धान्याच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य घ्यावे. सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावं.
गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे करुन हे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावेत. गोणपाटाचा एक तुकडा जमिनीवर पसरावा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर १० -१० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. अशाप्रकारे १०० दाण्याचे तीन नमुने तयार करावेत.
गोणपाट ओले करुन बियाण्यावर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. गोणपाटाच्या तुकड्यांची बियाण्यासकट गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावी. त्यावर अधून मधून पाणी शिंपडून बियाण्याची गुंडाळी सतत ओली ठेवावी.
६ ते ७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करुन मोजावेत. तिन्ही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभर दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासरखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. आणि शिफारशीप्रमाणे ते पेरणीसाठी वापरावे.
जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने ७० पेक्षा कमी म्हणजेच ६० पर्यंत असेल तर बियाण्याच प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी.
साठ टक्क्यांपेक्षा जर उगवणक्षमता कमी आली असेल तर असं बियाणे पेरणीसाठी वापरु नये.
अशा प्रकारे बियाण्याची उगवणक्षमता घरच्याघरी तपासून होणारं नुकसान टाळता येत.