Gabian Bunds : गॅबीयन बंधारा कसा बांधायचा?

Team Agrowon

गॅबियन बंधारा

जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो, त्याला ‘गॅबियन बंधारा’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी पर्जन्यमान आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असतो. तेथे पाण्याच्या प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाहीत. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त ठरतो.

Gabian Bunds | Agrowon

जमिनीची धूप रोखली जाते

पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते. त्यामुळे जमिनीची धूप देखील रोखली जाते.

Gabian Bunds | Agrowon

गॅबियन बंधाऱ्याचा आकार

गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी १० मीटरपेक्षा अधिक नसावी. तसेच बंधाऱ्याची उंची १ मीटरपेक्षा जास्त नसावी.

Gabian Bunds | Agrowon

बंधारा कुठे बांधावा?

नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. गॅबियन बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा खडकाळ नसावी. निवडलेल्या जागेत नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत. नंतर बांध बांधावयाच्या जागेवर १५ बाय १५ सेंमी आकाराची लोखंडी जाळी अंथरावी. त्या जाळीवर दगड रचून घ्यावेत.

Gabian Bunds | Agrowon

बांधाची लांबी - रुंदी किली असावी?

मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी. बांधाची माथा रुंदी ०.५० मीटर ठेवावी. तसेच बांधाच्या बाजूला १:१ या प्रमाणात उतार ठेवावा.

Gabian Bunds | Agrowon

बंधाऱ्याचा फायदा काय होतो?

कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा. गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.

Gabian Bunds | Agrowon
Banana Processing | Agrowon