Team Agrowon
सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. गेल्या ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले आहे.
अडीच महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे.
सततच्या पाण्याच्या उपशामुळे धरणातील पाणी पातळी आता उणे पातळीत पोचली आहे.
उजनी धरणाची १२० टीएमसी पाणी साठवणक्षमता आहे. पण, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण उणेमध्ये गेल्यानंतर ६४ टीएमसी पाणीसाठा राहतो .
२०१८-१९ मध्ये धरणातून उणे पातळीतील २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज आहे.
१५ जूनपर्यंत पाऊस झाल्यास मृत साठ्यातील १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागेल, अशी स्थिती आहे.
सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून ५६० क्युसेक व कॅनॉलमधून २२०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
धरणातून रोज पाणी सोडण्यात येत असल्यामुळे अर्धा टीएमसी पाणी संपत आहे. त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे धरण आता उणेपातळीमध्ये पोचले आहे.