Soybean Rate : सोयबीनला किती मिळतोय दर?

Team Agrowon

सोयबीन दर किती?

देशातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन शिल्लक आहे. पण भावपातळी अपेक्षित स्तरावर पोचली नसल्यानं शेतकरी थांबले आहेत. मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दिसतात. काही वेळ किंचित तेजी आली होती.

Spybean Rate | Agrowon

दर दबावात?

देशातील बाजारात सोयाबीन दर सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार, खाद्यतेलाचे कमी झालेले दर आणि सोयाबीन बाजारातील आवक अधिक असल्यानं दरावर दबाव आहे.

Spybean Rate | Agrowon

आवक अधिक

सध्या मध्य प्रदेशातील आवक अधिक असल्याचं दिसतं. मध्य प्रदेशात सध्या दैनंदीन ८० ते ९० हजार क्विंटलची आवक होतेय. तर महाराष्ट्रातील आवक ७० ते ८० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे. राजस्थानमधील आवक आता बऱ्यापैकी कमी झाली.

Spybean Rate | Agrowon

बाजारवर दबाव

सध्याची बाजारातील आवक गेल्यावर्षी याच काळात झालेल्या आवकेच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळं बाजारवर दबाव जाणवतोय.

Spybean Rate | Agrowon

दरात सध्या नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सध्या नरमाई आहे. तसेच चढ उतार सुरु आहेत. खाद्येतलाचे भाव ही नरमलेले आहेत. पामतेलाचे दर गेल्या अनेक दिवसांपासून नरमलेल्या पातळीवर आहेत.

Spybean Rate | Agrowon

वायद्यांमध्ये आजही नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांमध्ये आजही नरमाई आली. वायदे सायंकाळपर्यंत १४.८९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्येही घट होऊन ४४८ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता.

Spybean Rate | Agrowon

अर्जेंटीनाने शेतकऱ्यांसाठी सोयाडाॅलर धोरण जाहीर केलं. त्यामुळं येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकत आहेत.

Spybean Rate | Agrowon

चीननची सोयाबीन आवक जास्त दिसत असली दरी सरासरी प्रमाण कमी दिसतं.

Spybean Rate | Agrowon
Flower | Agrowon