Soybean Rate: सोयाबीन दरात किती वाढ झाली?

Team Agrowon

देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. मागील आठवडाभरात सोयाबीन दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची सुधारणा पाहाला मिळाली.

Soybean Rate | Agrowon

तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर काहीसे स्थिरावले आहेत. पण कच्चा इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे खाद्यतेलासह सोयातेल बाजारालाही आधार मिळत आहे.

Soybean Rate | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पूर्वपातळीवर पोचले. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे दरही पडले होते. पण मागील आठवड्यात दरात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली.

Soybean Rate | Agrowon

आज सायंकाळपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. सोयाबीनने १५.२५ डाॅलरचा टप्पा गाठल्यानंतर दरात काहीसे चढ उतार येत आहेत.

Soybean Rate | Agrowon

मागील दोन दिवसांपासून दर या पातळीच्या पुढे टिकत नाहीत. पण दरात घट होण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Soybean Rate | Agrowon

२३ मार्च रोजी सोयापेंड वायद्यांनी चालू हंगामातील सर्वात कमी ४३७ डाॅलरचा टप्पा गाठला होता. आता दरात सुधारणा झाली. मात्र दरपातळी अद्यापही कमीच आहे.

Soybean Rate | Agrowon
livestock | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा