Ethanol Market : इथेनॉलचे तेल कंपन्यांबरोबर किती झाले करार?

Team Agrowon

इथेनॉलचे करार

देशातील इथेनॉल उत्पादकांनी तेल कंपन्यांबरोबर मार्चच्या मध्यापर्यंत ४९६ कोटी लिटर इथेनॉलचे करार केले आहेत. त्यापैकी १४९ कोटी लिटरची प्रत्यक्षात खरेदीही कंपन्यांनी केली आहे.

Ethanol Market | Agrowon

उत्तर प्रदेशने सर्वाधिक ८२ कोटी लिटरचे, तर या खालोखाल महाराष्‍ट्राने ६७ कोटी लिटरचे करार केले आहेत.

Ethanol Market | Agrowon

डिसेंबर २२ ते ऑक्टोबर २३ अखेर ६०० कोटी लिटरची गरज इंधनामध्ये मिश्रण करण्यासाठी आहे. पेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे देशाचे सरासरी प्रमाण ११.५३ टक्के इतके आहे.

Ethanol Market | Agrowon

कारखाने इथेनॉल निर्मिती

यंदा केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्‍साहन दिल्याने अनेक कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले. पुरवठा केलेल्या १४९ कोटी लिटर पैकी ८२ कोटी लिटर इथेनॉल उसाच्या रसापासून तयार केले आहे.

Ethanol Market | Agrowon

४२ कोटी इथेनॉल बी हेवी मोलॅसिसपासून तयार केलेल्या इथेनॉलचे आहे.

Ethanol Market | Agrowon

८२ कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी १२ लाख टन साखर वळविण्यात आली. ४२ कोटी इथेनॉलसाठी ३.३० लाख टन साखर वळविण्यात आली.

Ethanol Market | Agrowon

१२ मार्चअखेर केलेल्या करारानुसार उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलचे करार १४२ कोटी लिटरचे, तर बी हेवी मोलॅसिसपासून तयार झालेल्या इथेनॉलचे करार २२० कोटी लिटरचे झाले आहेत.

Ethanol Market | Agrowon

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण केंद्राकडून मोहीम पातळीवर वाढविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये इथेनॉलची मागणी ५०० कोटींवरून ६०० कोटींवर पोचली आहे.

Ethanol Market | Agrowon
Turmeric Harvesting | Agrowon