Team Agrowon
सानेन शेळ्या इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते.
सानेन शेळीचे मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे.
या जातीच्या कासेवर, कानावर आणि नाकावर काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. पाय लहान आकाराचे आणि मान लांब आकाराची असते.
कान ताठ, मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो. मुख्यतः सानेन शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या शेळ्यांना शिंगे नसतात.
ही शेळी इतर सर्व शेळ्यांच्या तुलनेत जास्त दुधाचे उत्पादन देते. या शेळीपासून मिळणारे दूध सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे.
कान सरळ वरच्या दिशेने असतात.कासेचा आकार खूप मोठा असतो. एका प्रौढ नर सानेन शेळीचे वजन सुमारे ७०-९० किलो असते आणि प्रौढ मादी शेळीचे वजन हे ६५ ते ७० किलोपर्यंत असते.
२६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे,