Jaggery Powder : गूळ पावडर कशी तयार होते?

Team Agrowon

गूळ पावडर मध्ये ओलाव्याच प्रमाण अत्यंत कमी असल्यान साध्या गुळापेक्षा गूळ पावडरीची साठवणक्षमता चांगली असते. 

Jaggery Powder | Agrowon

गूळ पावडर तयार करताना कल्हईच तयार केलेला पातळ गूळ साच्यात न भरता वाफ्यातच थंड केला जातो. 

Jaggery Powder | Agrowon

गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच दाताळल्याने उभ्या व आडव्या रेघा मारून हलवून घेऊन गुळाचे लहान तुकडे केले जातात. 

Jaggery Powder | Agrowon

गुळाचे हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेवून वाळवतात. 

Jaggery Powder | Agrowon

गुळापासून तयार केलेल्या पावडरचा रंग विशिष्ट गुणधर्मामुळे गुळापेक्षा अधिक उठावदार असतो.

Jaggery Powder | Agrowon

वाळलेला गूळ लाकडी बडव्याने बारीक करुन वेगवेगळ्या चाळण्यातून चाळला जातो. चाळलेल्या गुळाची पावडर दोन ते तीन दिवस वाळवून त्यातील आद्रतेच प्रमाण कमी केल जातं. 

Jaggery Powder | Agrowon
Maize Processing | Agrowon