Dried Fig : सुक अंजीर कसं तयार होतं?

Team Agrowon

सुके अंजीर तयार करण्यासाठी पूना फिग, दिनकर, फुले राजेवाडी इ. जातींची फळे निवडावीत.

Dried Fig | Agrowon

निवडलेल्या अंजीर फळांमध्ये एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण (टीएसएस) १७ ते १८ ब्रिक्स दरम्यान असल्याची खात्री करावी. 

Dried Fig | Agrowon

फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळे मलमलच्या कापडात बांधून पॉटेशिअम मेटाबायसल्फाइटच्या (१ टक्का) उकळत्या द्रावणात ८ ते १० मिनिटे धरावीत. त्यानंतर फळे थंड होण्यास ठेवून द्यावीत. 

Dried Fig | Agrowon

फळे थंड झाल्यानंतर प्रतिकिलो फळांस गंधकाची (२ ग्रॅम याप्रमाणे) २ तास धुरी द्यावी. म्हणजे साठवणीच्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. धुरी दिलेली अंजीर फळे ५० टक्के साखरेच्या पाकात २४ तास भिजत ठेवावीत. 

Dried Fig | Agrowon

नंतर फळे पाकातून नितळून काढावीत. ही फळे ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास २४ ते ३६ तास ठेवावीत.

Dried Fig | Agrowon

वाळवलेली फळे थंड करून किचन प्रेसच्या साह्याने चपटी करून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरावीत. पिशव्या हवाबंद करून थंड, कोरड्या जागी साठवून ठेवावीत.

Dried Fig | Agrowon
Agricultural Drone | Agrowon