Team Agrowon
ताप किंवा अतिसार होत असल्यास किंवा हवामान खूप गरम असल्यास त्यांना अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.
पाणी खूप गरम किंवा थंड नसेल तर जनावरे अधिक प्रमाणात पाणी पितात. एका अनुमानानुसार, जेव्हा पाण्याचे तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे असते तेव्हा जनावरे अधिक पाणी पितात.
अशुद्ध पाण्यामुळे जनावरांना जंत होतात. जंतामुळे जनावरे त्यांचे खाद्य नीट पचवू शकत नाहीत. त्यांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
जनावरांना आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास त्यांचे खाद्य पूर्णपणे पचत नाही. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते.जनावरांसाठी पाणी सतत उपलब्ध असावे.
जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना उन्हाळ्यात दिवसातून ५ वेळा आणि हिवाळ्यात दिवसातून किमान ३ वेळा पाणी द्यावे.
जनावरांना दूध दिल्यानंतर पाणी द्यावे. जनावरांना त्यांच्या दैनंदिन वापरापैकी एक तृतीयांश पाणी दूध दिल्यानंतर आवश्यक असते.
आहार कितीही पोषण समृद्ध असला, तरी जनावरांना भरपूर पाणी न दिल्यास खाद्य प्रभावी ठरू शकत नाही. त्यामुळे जनावरांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देण गरजेचे आहेत.