Leptospyrosis Disease : लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रसार कसा होतो?

Team Agrowon

सांडपाणी

जनावरांची लघवी, गर्भाशयातील स्त्राव हे गटारातील पाणी, सांडपाणी, पुराचे रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळतात, यातून याचा प्रसार होतो.

Leptospyrosis Disease | Agrowon

उंदरांमार्फत

जिवाणू उंदराच्या शरीरात सुप्तावस्थेत असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने प्रसार होतो. हे जिवाणू डोळे, नाकातोंडातून तसेच माणसाच्या त्वचेवरील लहान जखमेतून शरीरात प्रवेश करतात.

Leptospyrosis Disease | Agrowon

मानसांनाही संसर्ग

भात शेती, ऊस मळ्यात काम करणारे शेतकरी, साचलेल्या पाण्यात/खाण  कामगार, जलवाहिन्या, गटारे, स्वच्छतागृहे यामध्ये काम करणारे मजूर, जनावरांच्या संपर्क येणारे शेतकरी, रोगाने बाधित जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक आणि कत्तलखान्यातील खाटीक यांना या आजाराचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 

Leptospyrosis Disease | Agrowon

पोहण्याचा तलाव

पोहण्याच्या तलावातील पाण्यातून संसर्ग देखील होऊ शकतो. 

Leptospyrosis Disease | Agrowon

गोठ्यातील अयोग्य व्यवस्थापन

गोठ्यातील अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी, चारा, खाद्य पदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्कात आल्यामुळे दूषितीकरण होते.

Leptospyrosis Disease | Agrowon

खूप पाऊस पडणाऱ्या भागात

खूप पाऊस पडणाऱ्या, पाणथळ, सखल भागात जेथे पाणी साठून राहते तसेच अल्कलीयुक्त क्षारयुक्त जमिनीच्या प्रदेशात, ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

Leptospyrosis Disease | Agrowon

प्राणी संक्रमक आजार

हा आजार सर्व पाळीव प्राणी, तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होतो. म्हणून या आजारास प्राणी संक्रमक आजार म्हणतात.

Leptospyrosis Disease | Agrowon
Bull Market | Agrowon