Fruit Crop Water Management : कमी पाण्यात फळबाग कशी जगवाल?

Team Agrowon

पाण्याचे योग्य नियोजन

उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकांना योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते. यामध्ये आच्छादन, मटका सिंचन, फळझाडांची छाटणी, ठिबक सिंचन, बाष्पोत्सर्जनाचा वापर अशा तंत्राचा अवलंब केला जातो.

Fruit Crop Water Management | Agrowon

मटका सिंचनाचा वापर

कमी क्षेत्रावरिल फळबागेमध्ये मटका सिंचनाचा वापर करता येतो. पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर होणाऱ्या या पद्धतीत कमी वयाच्या फळझाडांसाठी ५ ते ६ लिटर क्षमतेचे व मोठ्या फळझाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे.

Fruit Crop Water Management | Agrowon

झाडाचा आकार मर्यादित ठेवावा

वाढत्या तापमानामुळे झाडांवरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानांमधील पर्नरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात, त्यामुळे झाडाची छाटणी करुन झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास मदत होते.

Fruit Crop Water Management | Agrowon

पानोळ्याची छाटणी

झाडावरील पानांची संख्या कमी करावी म्हणजेच ३० टक्के पानोळ्याची छाटणी करावी. ज्या फळबागा फळावर असतील परंतु पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अशा वेळी फळांची संख्या कमी केल्याने देखील झाडांना पाण्याची गरज कमी पडते.

Fruit Crop Water Management | Agrowon

केओलीनची फवारणी

पानांच्या पर्नरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ८ टक्के केओलीन म्हणजेच ८०० ग्रॅम केओलीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे झाडाचे तापमान कमी होते आणि झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. आणि कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा झाड तग धरुन राहते.

Fruit Crop Water Management | Agrowon

बोर्डोपेस्ट चा वापर

झाडाच्या खोडाला १ टक्का बोर्डोपेस्ट लावल्याने खोडावर पडणारा सुर्यप्रकाश परावर्तीत होऊ झाडाचे उन्हापासून संरक्षण होते व होणारे नुकसान टाळता येते.

Fruit Crop Water Management | Agrowon

खोडाभोवती मातीचा थर

फळबागांमध्ये खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे काम करतो. 

Turkey Bajari Variety | Agrowon