Team Agrowon
आंतरमशागत केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होते. Mange,ent
भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.
आंतरमशागत केल्यामुळे पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो.
पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
किड नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर करावा.
फळबागेत आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो.
आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात.