Team Agrowon
ओलितांचे दांड नेहमी तणविरहीत ठेवावेत.
शेणखत अथवा कंपोस्ट कुजल्यानंतर वापरावे, तसेच खताच्या खडयावर तण वाढु देऊ नये.
शक्य असेल तिथे सलग पिकाऐवजी आंतरपीक घ्यावे.
पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो
तणाच्या नियंत्रणासाठी ही तणे कोवळी असताना म्हणजेच २ ते ४ पाने असताना तणनाशक फवारावे.
मजुरांची कमतरता भासल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकाचा वापर करावा.
हराळी, नागरमोथा, कुंधा या घातुक तणांच्या बंदोबस्तासाठी उन्हाळ्यात जमीन नांगरुन, वखरुन वर आलेल्या गाठी, काशा वेचुन जाळुन टाकाव्यात.