Poultry Deworming : कोंबड्यातील जंत निर्मूलन कसे कराल ?

Team Agrowon

जंत कोंबड्याच्या आतड्यामध्ये, इतर अवयवांमध्ये आढळतात. कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटे कृमी व टेपवर्म चा प्रादुर्भाव आढळतो.

Deworming practices in poultry | Agrowon

जंत पचवलेले अन्न खाऊन किंवा रक्तावर जगतात. जंत प्रादुर्भावामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते, परंतु वाढ खुंटते, निस्तेज दिसतात.

Poultry Deworming Information | Agrowon

कोंबडीच्या पोटाचा खालचा भाग मोठा दिसतो. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, रक्तक्षय होतो.

Poultry Deworming | Agrowon

जंतप्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त असेल तर विष्ठेमध्येही जंत दिसू लागतात.

Poultry Deworming | Agrowon

जंत प्रादुर्भावामुळे कोंबड्या अशक्त होतात, हगवण लागते, वजन कमी होते, अंडी उत्पादन कमी होते.

Poultry Deworming | Agrowon

Poultry Dewormingसर्वसाधारणपणे गादीवरील मोठ्या कोंबड्यांमध्ये महिन्यातून एकदा तर पिंजऱ्यातील कोंबड्यांमध्ये ३ महिन्यातून एकदा जंतनिर्मूलन करावे.

Poultry Deworming | Agrowon

जंतनिर्मूलनादिवशी व नंतर दोन दिवस जीवनसत्त्व व इलेक्‍ट्रोलाईट पाण्यातून कोंबड्यांना द्यावी. जेणेकरून जंतनिर्मूलनाचा ताण होणार नाही.

Poultry Deworming Management | Agrowon