Team Agrowon
मावा किडीचे पंखी व बिनपंखी असे दोन प्रकार आढळतात.
उसाच्या पानाच्या खालील बाजूने मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखा तंतुधारी बिनपंखी मावा जास्त प्रमाणात आढळतो. बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.
पंखी मावा काळपट रंगाचा असतो. त्याची मादी काळसर तर पिल्ले फिक्कट हिरवट रंगाची असतात.
किडीचे मुख्यांग सुईसारखे असते. पिल्लाच्या शरीरावर एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेण तंतू येऊन संपूर्ण शरीर पांढरे दिसते.
किडीच्या वाढीसाठी व प्रसारासाठी ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, ७० ते ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता हे हवामान घटक अनुकूल ठरतात.
राज्यात असे हवामान साधारणतः जून महिन्यापासून निर्माण होते. त्यामुळे किडीच्या अनेक पिढ्या होऊन किडीची संख्या झपाट्याने वाढते.