Rural Life : निसर्गात श्रीमंत आनंद किती स्वस्तात मिळतो ना ?

Manoj Kapade

निसर्गात असा श्रीमंत आनंद किती स्वस्तात मिळतो ना..?

Rural Life | Manoj Kapde

मुलांना रानात नेले आणि रानगोवऱ्याच्या चुलीवरचा स्वादिष्ट स्वयंपाक करून खाऊ घातला.

Rural Life | Manoj Kapde

मुले खुष झाली. डोंगरात हुंदडली, रानात झोपली, फुलांभोवती रेंगाळली, गव्हाच्या शेतात फिरली. खिशात रानमेवा (गावरान बोरं) आनंदानं घरी परतली.

Rural Life | Manoj Kapde

सह्याद्री पर्वतरांगांमधील अनेक गावांमध्ये अजूनही घरोघरी एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर) पोहोचलेला नाही. त्यामुळे महिलांना जंगलातून सरपण गोळा करीत डोक्यावर मोळी वाहून न्यावी लागते. त्याशिवाय घरातील चूल पेटत नाही..!

Rural Life | Manoj Kapde

सह्याद्रीच्या माळरानावरील कष्टकरी गुरख्याचे एक निर्मळ स्मित..!

Rural Life | Manoj Kapde

या मायमाउली त्यांच्या गोठ्यातून शेण काढून शेणाची पाटी डोक्यावर घेतात. डोक्यावर पाटीत शेण घेत दूर शेताजवळच्या उकिरड्यावर ते टाकावे लागते. शेण टाकण्याचे हे काम त्यांना सकाळ संध्याकाळ न चुकता करावे लागते..!

Rural Life | Manoj Kapde

सह्याद्रीचा भूमिपुत्र : शेती करून हे बाबा दिवसभर जनावरे चारतात. शेतीत भात सोडून काहीच पिकत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुलगा गवंडी काम करतो..!

Rural Life | Manoj Kapde
Agriculture Tourism | Agrowon