Green Manuring Crop : जमिन सुपीकतेसाठी हिरवळीची खते उपयुक्त कशी उपयुक्त आहेत?

Team Agrowon

सेंद्रिय कर्ब

दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाच प्रमाण हळू हळू घटत. अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात. 

Green Manuring Crop | Agrowon

हिरवळीची खते म्हणजे काय?

शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेल्या पिकांना हिरवळीची खते असे म्हणतात.

Green Manuring Crop | Agrowon

कापणी

नुकतेच फुलोऱ्यात आलेले हिरवळीचे पीक जमिनीलगत कापावे.

Green Manuring Crop | Agrowon

पीक गाडण्याची वेळ

हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. सामान्यतः ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलोऱ्यावर येतात. बाहेरून हिरवळीच्या पिकांची पाने आणून ते नांगरट किंवा चिखलणीपूर्वी टाकून गाडावीत. या वेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढवता येते. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले अन दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरू होते.

Green Manuring Crop | Agrowon

जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आवश्यक

हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करून आॅगस्टमध्ये गाडणी करावी. हे पीक गाडण्याच्या वेळी पाऊस पडला नसेल, किंवा जमिनीलगत ओलावा कमी असल्यास पाणी द्यावे. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.

Green Manuring Crop | Agrowon

कुजण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी

शेतात उपलब्ध काडी-कचरा व गवत ह्यांचे ढीग शेतात जागोजागी करून कुजू द्यावेत. योग्यवेळी जमिनीत गाडावेत. कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी खड्डयात गवत व काडी-कचरा कुजवता येईल.

Green Manuring Crop | Agrowon

नत्राचे प्रमाण

हिरवळीची खते प्रतिहेक्टरी सुमारे ५० -१७५ किलो नत्र उपलब्ध करतात. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवतात.

Green Manuring Crop | Agrowon