Bypass Proteins : दूध वाढीसाठी बायपास प्रथिने उपयुक्त आहेत का?

Team Agrowon

जनावारांच्या पोटातील सूक्ष्मजीव

जनावारांच्या पोटात असणारे सूक्ष्मजीव हे पोटात पचन होणाऱ्या प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये करतात, परंतु पोटात तयार सूक्ष्मजीव प्रथिने फक्त ४० ते ४५ टक्के अमिनो आम्लाच्या रूपात शोषून घेतले जातात.

Bypass Proteins | Agrowon

उत्तम दर्जा आणि अधिक प्रथिने

उत्तम दर्जा आणि अधिक प्रथिने असल्यामुळे संपूर्ण प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये होत नाही आणि त्याचा काही भाग वाया जातो.

Bypass Proteins | Agrowon

बायपास प्रथिने

पोटाच्या पहिला भागात ६० ते ७० टक्के पचन होणाऱ्या उत्तम दर्जाचे प्रथिने हे विविध कृत्रिम पद्धतीचा वापर करून फक्त २० ते २५ टक्के पचन होण्यास बायपास प्रथिने मदत करतात. या पद्धतीला ‘बायपास प्रथिने’ असे म्हणतात.

Bypass Proteins | Agrowon

दूध उत्पादन

चाराटंचाईच्या काळात निकृष्ट दर्जाचा चारा वापरला जातो. त्यामुळे जनावराच्या शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता भासते. त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर, तसेच जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. अशा परिस्थितीत प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर करता येतो.

Bypass protein | Agrowon

पोटातील पचन

जास्त प्रमाणात जनावरांच्या पोटात पचन होणाऱ्या प्रथिनांचे रूपांतर जनावरांच्या लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होण्यामध्ये करण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो

Bypass protein | Agrowon

जास्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी उपयुक्त

बायपास प्रथिने हे जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरांसाठी उपयुक्त आहेत. सरासरी १० ते १५ लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या (सरकी पेंड, सोयाबीन मिल) बायपास प्रथिनांचा वापर करावा.

Bypass protein | Agrowon
Khillar Breed | Agrowon