प्रितीसंगम पवारांसाठी 'तीर्थस्थळ' कसं आणि कधी झालं?

Team Agrowon

शरद पवार प्रितीसंगमावर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी कराडच्या प्रीती संगम येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण याच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले.

Priti Sangam | agrowon

कृष्णा-कोयनेचा संगम

उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना या दोन्ही नद्यांचा संगम कराड शहरानजकी होतो. त्या परिसराला प्रितीसंगम म्हणतात.  

Priti Sangam | agrowon

नदीकाठी घाट

नदी पात्राच्या पलिकडे वीर मारुतीचे मंदिर आहे. तसेच नदीकाठी घाट बांधलेला आहे.

Priti Sangam | agrowon

अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी निधन झाले. त्यांच्यावर येथील प्रीतीसंगमावर अंत्यसंस्कार झाले.

Priti Sangam | agrowon

प्रीतिसंगम उद्यान

त्यालाच लागून स्वामीची बाग होती. अंत्यसंस्कार व बागेच्या जागी यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रीतिसंगमावर 'प्रीतिसंगम उद्यान' बांधण्यात आले.

Priti Sangam | agrowon

यशवंतराव चव्हाणांचा विचार

शरद पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचे मानसपूत्र ओखळले जाते. ते नेहमीच यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करीत असल्याचे सांगतात. त्यामुळे कोणत्याही नवीन मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी पवार कुटुंबिय कराडला येत असतात.

Priti Sangam | agrowon

आत्मचिंतन

काही वर्षांपूर्वी अजित पवार यांनी धरणातील पाण्यावरून वादग्रस्त वक्तव्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी आत्मचिंतन केले होते.

Priti Sangam | agrowon
punganur cow | agrowon
आणखी पहा...