Anuradha Vipat
मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते चुकीच्या पद्धतीने घेतल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
मध कधीही उकळत्या पाण्यात किंवा अतिशय गरम दुधात टाकू नये.
एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कधीही मध देऊ नये.
मध हा साखरेचाच एक नैसर्गिक प्रकार आहे, त्यामुळे त्याचे अतिसेवन वजन वाढवू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मध थेट गॅसवर किंवा ओव्हनमध्ये गरम करू नये.
आयुर्वेदानुसार मध आणि तूप समान प्रमाणात एकत्र करून खाणे टाळावे.