Honey Centre Scheme : कमी खर्चाची मधकेंद्र योजना माहिती आहे का? बेरोजगारांना व्यवसायाची मोठी संधी

sandeep Shirguppe

मधकेंद्र योजना

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत २०१९ पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबवली जाते.

Honey Centre Scheme | agrowon

रोजगाराची नवी संधी

या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते.a

Honey Centre Scheme | agrowon

वैयक्तिक मधपाळ

या योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येते. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते.

Honey Centre Scheme | agrowon

प्रगतशील मधपाळ

या योजनेसाठी किमान १० वी पास, वय वर्षे २१ पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान १ एकर शेत जमीन असावी.

Honey Centre Scheme | agrowon

भाडे तत्वावरील जमीन चालेल

जर स्वत:ची जमीन नसल्यास भाडे तत्वावर असावी, लाभार्थींकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

Honey Centre Scheme | agrowon

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेंतर्ग मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे.

Honey Centre Scheme | agrowon

हमी भावाने मध खरेदी

शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यात येतो. विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेंतर्गत करण्यात येते.

Honey Centre Scheme | agrowon

अटी व शर्ती

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी लाभार्थींनी ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

Honey Centre Scheme | agrowon

योजनेच्या अधिक माहितीसाठी

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला नं.५, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा, पिन : ४१२८०६ (दुरध्वनी : ०२१६८-२६०२६४) यांच्याशी संपर्क साधावा.

Honey Centre Scheme | agrowon
nag panchami | Agrowon
आणखी पाहा...