Team Agrowon
पिक व्यवस्थापनामध्ये रुंद - वरंबा सरी पद्धत आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करुन जलसंधारण करता येते.
पीक व्यवस्थापन आणि जमीन व्यवस्थापनाद्वारे पिकामध्ये मुलस्थानी जलसंधारण करता येते.
जमीन व्यवस्थापनात जैविक बांध, जलसंवर्धन चर, मृत सरी आणि उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढून जलसंधारण करता येते.
शेताच्या बांधावर झुडूपवर्गीय वनस्पतीची लागवड करुन जैविक बांध तयार करता येतात.
काळ्या, खोल व भारी जमिनीत पाण्याच्या कमतरतेमुळे भेगा पडतात. अशा जमिनीवर जलसंधारणाकरिता पर्यायी उपाय म्हणून जलसंवर्धन चर फायदेशीर ठरतात.
जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी काढण्यात आलेली खोल सरी मूलस्थानी जलसंधारणाची एक साधी व उपयुक्त पद्धत आहे.
जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी काढण्यात आलेली खोल सरी मूलस्थानी जलसंधारणाची एक साधी व उपयुक्त पद्धत आहे.