Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या साडेतीन शक्तिपीठांसह राज्यातील इतर जागृत मंदिरांमध्ये दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात.
या पवित्र दिवसांमध्ये महाराष्ट्रातील ज्या प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन घेतल्याने असीम कृपा लाभते, त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख आणि संपन्न शक्तिपीठ मानले जाते. या मंदिराला 'दक्षिण काशी' म्हणूनही ओळखले जाते. येथे देवीची मूर्ती एका शिळेवर कोरलेली असून ती चतुर्भुज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून तुळजापूरच्या भवानी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील देवीची मूर्ती 'चलायमान' आहे, असे मानले जाते की वर्षभरातून काही वेळा देवीला मंचकावर निद्रिस्त केले जाते.
हे शक्तिपीठ भगवान परशुराम यांची माता रेणुका यांचे मूळ स्थान मानले जाते. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. येथील मंदिरात देवीचे संपूर्ण रूप न दिसता केवळ तिचे 'मुखकमल' दिसते.
सह्याद्रीच्या सात शिखरांच्या कुशीत वसलेले हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ आहे. येथील देवीची मूर्ती अत्यंत भव्य असून ती तब्बल ८ फूट उंच आणि अठरा हातांची (अष्टदशभुजा) आहे.
कोळी बांधवांची आणि अनेक कुटुंबांची ही कुलस्वामिनी आहे. कार्ला लेण्यांच्या जवळ डोंगरावर हे मंदिर असून नवरात्रीत आणि चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.