Team Agrowon
हिमाचल प्रदेशवर आभाळ फाटले असून १० वर्षांपूर्वी झालेल्या केदारनाथसारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचे प्रमाण इतके होते की मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते. त्यामुळे टोलेजंग इमारती पत्यासारख्या कोसळत आहेत
दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसांमुळे त्सुनामीसारख्या भयानक लाटा नद्यांमधून वाहत आहेत.
वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात नदींवरील पूल वाहून गेलेत, तर काही ठिकाणी रस्ते खचल्याने अनेक मार्ग बंद आहेत.
या भयंकर पाऊसात अनेक घर आणि वाहने वाहून गेली आहेत
हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
महापूरात सुमारे १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.