Clay Water Pot : फ्रिजचे पाणी सोडा, माठाचे पाणी प्या! जाणून घ्या मातीचा माठ वापरण्याचे वैज्ञानिक फायदे

Anuradha Vipat

वरदान

मातीच्या माठातील नैसर्गिकरित्या थंड आणि शुद्ध पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच वरदान मानले जाते.

Clay Water Pot | Agrowon

फायदे

आपल्या पूर्वजांच्या काळापासून पाणी साठवण्यासाठी मातीचा माठ वापरला जात आहे. यामागे केवळ परंपरा नाही, तर मोठे वैज्ञानिक आणि आरोग्यदायी फायदे लपलेले आहेत.

Clay Water Pot | Agrowon

नैसर्गिक कूलिंग

मातीच्या माठाला सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते. यामुळे पाणी फ्रिजसारखे हाडे गोठवणारे थंड न होता, घशाला आणि पोटाला सुखावणारे नैसर्गिक थंड होते.

Clay Water Pot | agrowon

पाणी शुद्ध होते

जेव्हा आपण माठात पाणी ठेवतो, तेव्हा ते मातीच्या थरांमधून झिरपल्यामुळे पाण्यातील अशुद्धी, कचरा आणि हानिकारक रसायने नैसर्गिकरित्या नष्ट होतात.

Clay Water Pot | Agrowon

पाण्याचा pH स्तर

माठातील पाणी पाण्याचा pH स्तर नियंत्रित ठेवते. हे अल्कधर्मी पाणी प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवत नाही.

Clay Water Pot | Agrowon

चयापचय

माठातले पाणी शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राखते आणि पचनक्रिया मजबूत करते.

Clay Water Pot | agrowon

घसा आणि छाती

माठातल्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाशी सुसंगत असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने घशाला कोणतीही दुखापत होत नाही आणि खोकल्याचा त्रास टळतो.

Clay Water Pot | Agrowon

Iron Cookware Benefits : नॉन-स्टिक सोडा, लोखंडी कढई निवडा! जाणून घ्या चमत्कारी फायदे

Iron Cookware Benefits : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...