Anuradha Vipat
खाण्यात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार निरोगी व्यक्तीने दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणे आवश्यक आहे.
शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास शरीर जास्त पाणी साठवून ठेवते. यामुळे हात, पाय, चेहरा आणि पोट फुगल्यासारखे वाटते.
रक्तप्रवाहातील सोडियम संतुलित करण्यासाठी मेंदू सतत पाणी पिण्याचे संकेत देतो, ज्यामुळे वारंवार तहान लागते.
मिठातील सोडियम रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढवते. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब झपाट्याने वाढतो.
सतत रक्तदाब उच्च राहिल्याने हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
जास्त मीठ शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला दुप्पट काम करावे लागते. यामुळे किडनी कमकुवत होते.