Sainath Jadhav
मुसळधार पावसामुळे कण्हेर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. १९ जून २०२५ सायं. ७ वाजेपासून ५०० क्युसेक आणि २० जून सकाळी ६ वाजेपासून सांडव्याद्वारे १,००० क्युसेक पाणी वेण्णा नदीत सोडले जाणार आहे.
सोलापूरच्या उजनी धरणात ६३% पाणीसाठा आहे. ५८,००० क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून २० जून २०२५ दुपारी १२ वाजेपासून ७,८९८ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे, जे आधीच्या ११,९२४ क्युसेकपेक्षा कमी आहे. पावसानुसार विसर्ग बदलू शकतो.
कोयना धरणात पाण्याची पातळी वाढल्याने २० जून २०२५ सकाळी ९ वाजेपासून १,०५० क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जाणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा.
घोड धरणातून घोड नदीत ४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर धरणातून १२,६२० क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कासारसाई धरण १९ जून २०२५ रोजी ७४% भरले आहे. पावसामुळे सांडव्याद्वारे विसर्गाची शक्यता.
दारणा धरणातून ४,७०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा.