Team Agrowon
कफाचे विकार, जंतुसंसर्ग, घसा खवखवणे, सर्दी यांसारख्या तक्रारींमध्ये हळद आणि दूध दीर्घकाळापर्यंत घ्यावे.
हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत.
केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.
आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते.
हळदीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कुरक्युमीन रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते.
औषध म्हणून हळदीचा उपयोग करताना चांगल्या प्रतीची ओली हळद वाळवून उपयोग करावा किंवा हळकुंडे दळून आणावीत.
हळद रक्तदोष नाहीसा करते. त्यामुळे त्वचाविकारातील औषधांत हळदीचा समावेश करतात.
आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमिनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपित करणारी आहे.