Anuradha Vipat
लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण वाढीसाठी त्यांचा आहार संतुलित, पोषक तत्वांनी भरपूर आणि सर्व अन्नगटांचा समावेश असलेला असावा.
लहान मुलांच्या आहारात मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स, प्रथिनांचे प्रमाण, जीवनसत्त्वे , आणि खनिजे यांचा योग्य ताळमेळ असणे गरजेचे आहे.
मुलांना मैदा देण्याऐवजी गव्हाची चपाती, ओट्स, ब्राऊन राईस किंवा ज्वारी-बाजरीची भाकरी द्यावी.
वरण-भात, मूग, मटकी, चणे यांसारखी कडधान्ये आणि डाळींचा आहारात नियमित समावेश करा.
अंडी, चिकन किंवा मासे हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत.
रोज किमान १ ते २ ग्लास दूध, ताजे दही किंवा पनीर द्यावे.
सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब किंवा हंगामी फळे खाण्याची सवय लावा.