Healthy Dinner Ideas : रात्रीचं हलकं आणि आरोग्यदायी जेवण कसं असावं?

Anuradha Vipat

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण हलके असणे केवळ पचनासाठीच नाही तर शांत झोपेसाठीही आवश्यक असते.

Healthy Dinner Ideas | Agrowon

सोपे आणि पचायला हलके

 रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी, कडधान्यांचे सूप, किंवा दलिया यांचा समावेश करा.

Healthy Dinner Ideas | agrowon

प्रथिने आणि भाज्या

पनीर, सोयाबीन किंवा उकडलेली अंडी यांसारख्या प्रथिनांसोबत भरपूर प्रमाणात पालेभाज्या किंवा वाफवलेल्या भाज्या खाव्यात.

Healthy Dinner Ideas | agrowon

कर्बोदकांचे प्रमाण

रात्री जास्त प्रमाणात भात किंवा जड पोळ्या खाणे टाळा. त्याऐवजी ज्वारीची किंवा नाचणीची एक भाकरी खाणे उत्तम.

Healthy Dinner Ideas | agrowon

तेलकट आणि तिखट

जास्त मसाल्याचे, तळलेले किंवा बाहेरचे 'जंक फूड' रात्री अजिबात खाऊ नका.

Healthy Dinner Ideas | agrowon

वेळेचे गणित

झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी जेवण करा. यामुळे अन्नाचे पचन नीट होण्यास वेळ मिळतो.

Healthy Dinner Ideas | agrowon

कोमट पाण्याचे सेवन

जेवणानंतर अर्ध्या तासाने थोडे कोमट पाणी प्यायल्याने पचन प्रक्रिया सुधारते

Healthy Dinner Ideas | Agrowon

Dandruff Treatment : डोक्यातला कोंडा कमी होत नाही? करा हा उपाय

Dandruff Treatment | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...