Anuradha Vipat
जंक फूड खाणे टाळून त्याऐवजी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला नक्कीच फायदा होईल.
आरोग्यदायी पदार्थ चवीला उत्तम असतात आणि भूक शमवून शरीराला आवश्यक पोषण देतात.
चणे हे प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. ते खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि बराच वेळ भूक लागत नाही.
मूठभर सुका मेवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि ऊर्जा मिळते.
फळांमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीराला ऊर्जा देतात.
दही आणि ताक हे पचनासाठी खूप चांगले असतात. ताक पिल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि भूक शांत होते.
हे पचायला हलके असतात आणि झटपट ऊर्जा देतात. तुम्ही चटपटीत भेळ किंवा पोहे खाऊ शकता.