Sanjana Hebbalkar
कडुलिंब हे नाव घेतलं की अनेकांचे चेहरे पडतात. चवीला कडू असणाऱ्या कडुलिंबाचे अनेक फायदे देखील आहेत.
गुढीपाडवा सारख्या महत्त्वाच्या सणाला कडुलिंबाच्या पानांचं सेवन केलं जातं. कडुलिंबांच महत्त्व पूर्वीपासूनच अधोरेखित करण्यात आलं आहे.
कडुलिबांची पान १० ते १५ मिनिट भिजवून ठेवायची आहेत. त्यानंतर ती पाने मिक्सरला थोडसं पाणी टाकून बारीक करुव घ्यायची आहेत
हे ज्युस उपाशीपोटी पिल्यास त्याचे प्रचंड फायदे होतात. यामुळे होणारी जळजळ कमी होते. शिवाय बद्धकोष्ठता, अल्सर आतड्यांना सूज येणे थांबते.
कडुलिंबाच्या पानांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे केसांमध्ये होणारा कोंडा कमी होतो. शिवाय केसांना डॅमेज करणाऱ्या घटकांना वाढण्यापासून रोखण्याचं काम कडुलिंब करत असतं.
खेड्यापाड्यांमध्ये अजूनदेखील लोक कडुलिंबाच्या काट्यांनी दात घासतात. यामुळे दातांच आयुष्य दिर्घकाळ राहतं आणि तोडांतील जतूंपासून आपलं सरंक्षण करतं.
कडुलिंबा इतका चांगला डिटॉक्सिफाइंग घटक कोणताच नाही आहे. कडुलिंब शरीरात प्रवेश करताच रक्त शुद्ध करण्याच काम करतात.