Anuradha Vipat
स्विट कॉर्न चवीला तर उत्तम असतोच, पण आरोग्यासाठी त्याचे फायदे एखाद्या 'सुपरफूड'पेक्षा कमी नाहीत.
स्विट कॉर्नमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो .
यात लोह आणि व्हिटॅमिन बी-१२ असते. हे घटक शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात.
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि शरीरात झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी मका खाणे फायदेशीर ठरते.
स्विट कॉर्न डोळ्यांचे आरोग्य जपतात आणि वाढत्या वयानुसार येणारा मोतीबिंदूचा धोका कमी करतात.
फायबर जास्त असल्यामुळे मका खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेले वाटते.
मक्याचे तेल किंवा मका खाणे केसांच्या मजबुतीसाठीही चांगले असते.