Anuradha Vipat
उन्हाळ्यात पुदिना केवळ थंडावा देत नाही, तर अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतो.
आयुर्वेदात पुदिन्याला त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व आहे.
पुदिन्यात मेन्थॉल असते, जे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते .
उन्हाळ्यात वारंवार होणारे अपचन, गॅस आणि ॲसिडिटी यावर पुदिना रामबाण उपाय आहे.
बाहेर जाण्यापूर्वी पुदिन्याचे सरबत किंवा पाणी प्यायल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो.
पुदिन्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म उन्हाळ्यात येणारे घामट आणि पुरळ कमी करण्यास मदत करतात.
पुदिना नैसर्गिक माऊथ फ्रेशनर आहे. याच्या पानांच्या सेवनाने श्वासाची दुर्गंधी दूर होते.