Team Agrowon
अनेकजण जेवणात सुरणाची भाजी दिसली की नाक मुरडतात. पण याच सुरणाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.
सुरण हे हे कंदवर्गीय पीक असून ते जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा प्रकार आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो.
सुरण ही जमिनीमध्ये वर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहते. आणि फक्त पावसाळ्याच्या चारच महिन्यात तरारून वाढणारे पीक आहे.
सुरणाचा कंद हा काहीसा ओबडधोबड, अर्धगोलाकृती, काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो आणि आतून किंचित लालसर किंवा किंचित बदामी रंगाचा असतो.
सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीसाठी गुणकारी आहे. यामुळे यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते.
सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे आजार यांवर गुणकारी आहे.
संधिवातात सुरणाच्या कंदाचा आणि बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते. तसेच आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे गुणकारी आहे.