sandeep Shirguppe
कोमट पाणी आणि ओवा एकत्र चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीच्या समस्या कमी होतात.
रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास गॅसची समस्या बरी होईल.
वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.
जेवल्यानंतर पोट जड होत असेल तर कोमट पाणी आणि ओवा खा. काही मिनीटात पोट हलके होईल.
ओव्यामध्ये शरीर आणि मन शांत करणारे तसेच शांत झोप आणणारे गुणधर्म आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर कोमट पाण्यासोबत ओवा खा. संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
ओवा खाणे विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीचे त्रास कमी होतात.
ओवा खाल्ल्याने हार्मोनल संतुलन राखले जाते आणि रक्ताभिसरण सुधारते.