Mahesh Gaikwad
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात म्हणून अनेकजण केळी खाण्याचा सल्ला देतात.
वाढत्या वयातील लहान मुलांना केळी खायला दिल्याने आरोग्य सुधारते. शिवाय कमी वजन असणाऱ्यांना डॉक्टर आहारात केळी खाण्यास सांगतात.
आजपर्यंत तुम्ही पिवळ्या रंगाची साल असणारीच केळी खाल्ली असतील. पण तुम्ही कधी लाल रंगाची केळी खाल्ली आहेत का?
लाल केळी ही पिवळ्या केळीप्रमाणेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आज आपण लाल केळी खाण्याचे काय फायदे आहेत, याची माबिती पाहणार आहोत.
पिवळ्या केळीच्या तुलनेत लाल केळीमध्ये अधिक प्रमाणात बीटा-कॅरोटीन असते. तसेच यामध्ये व्हिटामिन-ए, बी, आणि सी असते.
तसेच लाल केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर हे घटकही असतात. जे पोटासाठी फायदेशीर असते.
यातील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटामिन-ए हे घटक डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
याशिवाय लाल केळी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते.
याशिवाय रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या असणाऱ्या रूग्णांनीही लाल केळी खाल्ल्याने फायदा होतो. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.