sandeep Shirguppe
तांदळापासून बनवलेले मुरमुरे केवळ चवच वाढवत नाही तर आरोग्य वाढवण्यातही चांगली भूमिका बजावतात.
एका संशोधनानुसार, मुरमुऱ्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्व पुरेशा प्रमाणात असतात.
मुरमुरे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. मुरमुऱ्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात.
मुरमुऱ्यात लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, कॅल्शियम सारखी इतर अनेक खनिजे असतात.
याचबरोबर पुफ केलेल्या तांदळात बी व्हिटॅमिन, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि पॅन्टोथेनिक अॅसिड असते, जे तुमचे शरीर निरोगी बनवते.
संशोधनानुसार मुरमुऱ्यात व्हिटॅमिन-बी मुबलक प्रमाणात असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हे जीवनसत्व खूप प्रभावी आहे.
मुरमुऱ्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
मुरमुऱ्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्स असतात, जे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.