Mahesh Gaikwad
आयुर्वेदामध्ये कडुनिंबाचे विषेश महत्त्व आहे. त्यामुळेच कडुनिंबाच्या झाडाला औषधी गुणधर्मांची खाण म्हटले जाते.
कडुनिंब ही एक औषधी वनस्पती असून याची पाने चघळल्याने शरीराला आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात.
आज आपण कडुनिंबाच्या पाने सकाळी उपाशीपोटी चघळल्याने काय फायदे होतात, याची माहिती पाहणार आहोत.
आयुर्वेदानुसार, उपाशीपोटी कडुनिंबाची पाने चघळल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते.
तसेच उपाशीपोटी कडुनिंबाची पाने चघळल्याने मुत्रमार्गातील संसर्ग झाला असल्यास त्यापासून आराम मिळतो.
कडुनिंबाची पाने खाल्ल्याने शरीरारची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते.
पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यासाठी उपाशीपोटी कडुनिंबाची पाने खाणे फायदेशीर असते.
कडुनिंबाच्या पानांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तसेच शरीरातील रक्त शुध्दीकरण होण्यासही यामुळे मदत होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.