लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-सी असते. तसेच यात पोटॅशिअम आणि सोडियमसह अनेक पोषक घटक असतात.
लिंबाचे जसे आरोग्यासाठी फायदे आहेत, तसेच त्याची पाने चघळण्याचेही आरोग्याला फायदे होतात.
आरोग्याच्या अनेक समस्यांवर लिंबाची पाने चघळल्याने फायदा होतो. लिंबाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-सी असते.
लिंबाची पाने चघळल्याने शरीरातील लोहाची कमी भरून निघते. परिणामी शरीरातील रक्तही वाढते.
लिंबाच्या पानातील व्हिटामिन-सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे विविध प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होतो.
जर तुम्हाला तणावाची समस्या जाणवत असेल, तर लिंबाची पाने हुंगल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.
लिंबाच्या पानांमध्ये फायबर घटक असतो. ज्यामुळे बे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.