Rainy Vegetables : चव लई न्यारी...रानातल्या मेव्याचा आस्वाद घेतलाय का तुम्ही?

Team Agrowon

रानभाज्या

रानभाज्या म्हणजे रानावनात पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या. ज्याला आपण रानमेवा म्हणतो.

Rainy Vegetables | Agrowon

पावसाळ्यात डोकावतात

माॅन्सूनच्या पावसाचे आगमन झाले की रानावनात आपोआप रानभाज्या उगवतात. त्यासाठी कुणी त्याची लागवड करत नाही. ना कोणतं खत, ना रासायनिक फवारण्या करत नाही.

Rainy Vegetables | Agrowon

खवय्यांचा शोध

या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले खवय्ये अशा भाज्यांच्या शोधात असतात

Rainy Vegetables | Agrowon

आदिवासी बांधवांचे योगदान

वर्षातून एकदाच येणाऱ्या रानभाज्या म्हणजे खऱ्या अर्थाने रानमेवाच असतो. रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे.

Rainy Vegetables | Agrowon

आदिवासी दिन

संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने रानभाजी महोत्सवाचे आयोजित केला जातो.

Rainy Vegetables | Agrowon

असंख्य भाज्या

अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीचे फुलं आणि इतर प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध असतात

Rainy Vegetables | Agrowon

भाज्यांचा प्रचार

या महोत्सवामध्ये उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म लोकांपर्यंत पोहचवले जातात.

Rainy Vegetables | Agrowon

विषमुक्त भाज्या

या रानभाज्यांमुळे खवय्यांना विषमुक्त अन्न मिळत आहे. त्याचबरोबर त्याचा लाभही त्यांना मिळतो.

Rainy Vegetables | Agrowon
ujani-dam | Agrowon
आणखी पहा..