Lumpy Skin Disease : गोठ्यातल्या जनावरांना लंपी आजार झालाय ? हे कसं ओळखायचं घ्या जाणून?

Team Agrowon

लंपीचा विळखा

सध्या राज्यभरात जनावरांमध्ये लम्पी हा विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुधनाला विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे.

Lumpy Skin Disease | Agrowon

संकरित जनावरांना आजार

त्याचा प्रादुर्भाव गायी, म्हशींमध्ये आढळून येतो. तसेच त्याची तीव्रता संकरित गायींमध्ये अधिक प्रमाणात असते.

Lumpy Skin Disease | Agrowon

उत्पादनात घट

या आजारामुळे जनावरे अशक्त होत असतात. त्यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.

Lumpy Skin Disease | Agrowon

जनावरे अशक्त

जनावर अशक्त होते. पण मरतुकीचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते.

Lumpy Skin Disease | Agrowon

त्वचा खराब

यामध्ये जनावराची त्वचा कायमस्वरूपी खराब होते. त्यामुळे जनावरे विकृत दिसायला लागता. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य घटते.

Lumpy Skin Disease | Agrowon

जनावरांची लक्षणे

जनावरांना पहिल्या टप्प्यात तीव्र स्वरूपाचा ताप येतो. त्यानंतर डोळ्यांतून पाणी, नाकातून स्राव सुरू होतो.

Lumpy Skin Disease | Agrowon

रोगाचे संक्रमण

बाधित नराचा संयोग मादीसोबत झाल्यानंतर वीर्यातील विषाणूंमुळे मादीत रोगाचे संक्रमण होऊ शकते.

Lumpy Skin Disease | Agrowon
ujani-dam | Agrowon
आणखी पहा...